मोशीतील नूतन प्रशालेमधील १४ वर्षाच्या विद्यार्थ्याला शिक्षकाने केली जबर मारहाण

0
593

मोशी, दि. ३ (पीसीबी) – शाळेतील शिक्षकांची नक्कल करतो या गैरसमजातून एका शिक्षकाने १४ वर्षीय मुलाला हाताने आणि काठीने पाटीवर जबर मारहाण केली. या घटनेत विद्यार्थी जखमी झाला आहे. ही घटना बुधवारी (दि.२) सायंकाळी पाचच्या सुमारास मोशीतील नूतन प्रशाला बोऱ्हाडेवाडी येथे घडली.

याप्रकरणी जखमी विद्यार्थ्याच्या आईने भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, शाळेतील हिंदी विषयाचे शिक्षक व्यंकटेश कळसाईत (वय २६, रा. चिखली, कृष्णानगर) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिेलेल्या माहितीनुसार, जखमी १४ वर्षीय विद्यार्थी हा मोशी येथील नूतन प्रशाला मध्ये आठवीच्या वर्गात शिक्षण घेत आहे. बुधवारी सायंकाळी शाळेतील शिक्षकांची नक्कल करतो याचा गैरसमज झाल्याने शाळेतील हिंदी विषयाचे शिक्षक कळसाईत यांनी त्या विद्यार्थ्याला हाताने आणि काठीने पाठीवर जबर मारहाण केली. तसेच शाळा सुटल्यानंतर त्याला शाळेत थांबवून घेऊन पिळवणूक केली. याप्रकरणी कळसाईत यांना भोसरी एमआयडीसी पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. सहायक फौजदार माळी तपास करत आहेत.