मोशीतील पालिकेच्या शाळेमधल्या १४ वर्षी विद्यार्थ्याला शिक्षकाने केली जबर मारहाण

0
330

मोशी, दि. ३ (पीसीबी) – शाळेतील शिक्षकांची नक्कल करतो या गैरसमजातून पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या मोशीतील शाळेमधल्या एका शिक्षकाने १४ वर्षीय मुलाला हाताने आणि काठीने पाटीवर जबर मारहाण केली. या घटनेत विद्यार्थी जखमी झाला आहे. ही घटना बुधवारी (दि.२) सायंकाळी पाचच्या सुमारास पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या मोशीतील नूतन महानगरपालिक प्रशाला बोऱ्हाडेवाडी येथे घडली.