मोठी बातमी ! दहावीचा निकाल उद्या होणार जाहीर, विद्यार्थ्यांनो असा चेक करा रिझल्ट

0
319

मुंबई, दि. १६ (पीसीबी) – बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर दहावीच्या विद्यार्थी आणि त्यांचे पालक निकाल कधी जाहीर होणार याची वाट पाहत होते. अखेर त्यांची प्रतीक्षा संपली असून दहावीचा निकाल उद्या म्हणजेच 17 जून रोजी जाहीर करण्यात येणार आहे. महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ सेकेंडरी अँड एज्युकेशन (MSBSHSE) मार्फत उद्या दहावीचा निकाल जाहीर करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. उद्या निकाल जाहीर होणार असल्यामुळे विद्यार्थ्यांची धाकधुक वाढली आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च-एप्रिल 2022 मध्ये आयोजित करण्यात आलेल्या माध्यमिक शाळांत प्रमाणपत्र दहावी परीक्षेचा निकाल मंडळाच्या कार्यपद्धतीनुसार उद्या म्हणजेच 17 जून 2022 रोजी जाहीर करण्यात येणार आहे. उद्या दुपारी 1 वाजता ऑनलाईन पद्धतीने दहावीचा निकाल जाहीर होणार आहे. शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी देखील ट्वीट करत उद्या निकाल जाहीर होणार असल्याचे सांगितले आहे. तसंच त्यांनी सर्व विद्यार्थ्यांना आणि पालकांना शुभेच्छा दिल्या आहेत.

दहावीच्या परीक्षेसाठी एकूण 16 लाख 39 हजार 172 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यामध्ये 8 लाख 89 हजार 584 विद्यार्थी तर 7 लाख 49 हजार 487 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे दहावीचा निकाल 20 जूनपर्यंत जाहीर होणार असल्याचे सांगण्यात आले होते. अखेर आज निकाल जाहीर होण्याची तारीख जाहीर करण्यात आली असून उद्या दुपारी 1 वाजेपर्यंत दहावीचा ऑनलाइन निकाल जाहीर होईल.

SSC Result 2022 : असा पाहा निकाल

विद्यार्थी किंवा पालक खाली दिलेल्या स्‍टेप्‍स फॉलो करून निकाल चेक करू शकतात….

– दहावी बोर्डाचा निकाल पाहण्यासाठी mahresult.nic.in या संकेतस्थळाला भेट द्यावी लागेल.
– येथे वेबसाइटवर तुम्हाला निकालाच्या लिंकवर क्लिक करावे लागेल.
– यानंतर तेथे तुमचा रोल नंबर आणि जन्मतारीख आणि आवश्यक माहिती भरावी लागेल.
– यानतंर निकाल तुमच्या स्क्रीनवर प्रदर्शित होईल.
– तुम्ही हा निकाल डाउनलोड करा किंवा सेव्ह करू शकता.

SSC Result 2022 : अधिकृत वेबसाइटची यादी

> mahahsscboard.in
> msbshse.co.in
> mh-ssc.ac.in
> mahresult.nic.in

SSC Result 2022 : SMS द्वारे असा पाहा निकाल

निकाल जाहीर करताना अनेकदा सर्व्हर डाऊन झाल्याचे किंवा वेबसाइट क्रॅश झाल्याचे अनेकवेळा दिसून आले आहे. अशा परिस्थितीत विद्यार्थी इंटरनेटशिवायही फोनवरून आपला निकाल (Maharashtra Board 10th Result 2022) पाहू शकतात. निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रथम मेसेज अॅप ओपन करावे लागेल. यानंतर MHSSC आसन क्रमांक प्रविष्ट करा. त्यानंतर स्पेस देऊन 57766 या क्रमांकावर संदेश पाठवा. काही वेळाने तुम्हाला मेसेजद्वारे निकाल प्राप्त होईल.