शेअर्स ट्रेडिंगच्या नावाखाली २५ लाखांची ऑनलाइन फसवणूक

0
1

दि.१७(पीसीबी)-इंस्टाग्रामवर जाहिरात पाहून शेअर्स ट्रेडिंगमध्ये पैसे गुंतवणाऱ्या एका व्यक्तीची २५ लाख ३० हजार रुपयांची ऑनलाइन फसवणूक करण्यात आली. ही घटना २६ जानेवारी ते ६ मार्च २०२६ दरम्यान सोमाटणे, मावळ येथे घडली.या प्रकरणात एका व्यक्तीने तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीने इंस्टाग्रामवर ब्लॉक ट्रेडिंग संदर्भात एचडीएफसी सिक्युरिटीजशी संबंधित जाहिरात पाहिली होती. त्यानंतर आरोपींनी त्यांना एका व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सामील करून घेतले. ग्रुप मधील अज्ञात व्यक्तीने स्वतःची ओळख बँकेचा प्रतिनिधी म्हणून करून दिली. अज्ञात व्यक्तीने फिर्यादी यांना गुंतवणूक करण्यास सांगितले. त्यामुळे फिर्यादीने विश्वासाने वेळोवेळी २५ लाख ३० हजार रुपये गुंतवले, मात्र त्यांना शेअर्स मिळाले नाहीत आणि परतावाही मिळाला नाही. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करत आहेत.