मेक्सिकोच्या ‘व्हेनेसा पोन्स डी लिऑन’ने ‘मिस वर्ल्ड २०१८’ चा किताब पटकावला

0
905

बीजिंग, दि. ९ (पीसीबी)  – जागतिक सौंदर्य स्पर्धेत  महत्त्वपूर्ण मानली जाणारी ‘मिस वर्ल्ड २०१८’चा मुकुट मेक्सिकोच्या व्हेनेसा पोन्स डी लिऑन हिने पटकावला. चीनच्या सान्या शहरात ६८ वी ‘मिस वर्ल्ड २०१८’ स्पर्धा आयोजित केली होती.  गतवर्षी भारताची सौंदर्यवती मानुषी छिल्लर मिस वर्ल्ड स्पर्धेची विजेती ठरली होती.

मानुषीनेच व्हेनेसाला मिस वर्ल्डचा मुकुट घातला. या स्पर्धेत विविध देशांतील ११८ स्पर्धकांनी भाग घेतला होता. या स्पर्धेत सहभागी झालेली भारताची अनुकृती वास ही टॉप ३० पर्यंत पोहोचण्यात यशस्वी ठरली. तर थायलंडची निकोलेन पिशापा उपविजेती ठरली.

व्हेनेसाचा जन्म ७ मार्च १९९२ रोजी झाला असून ती मेक्सिकन मॉडेल आहे. ‘मिस वर्ल्ड’चा किताब जिंकणारी ती पहिलीच मेक्सिकन तरुणी ठरली आहे. सौंदर्य आणि बुद्धी अशा दोन्ही गोष्टींची दैवी देणगी लाभलेली व्हेनेसा २०१४पासून मॉडेलिंग क्षेत्रात आहे. यासोबतच सामाजिक कार्यातही तिचा सहभाग आहे. व्हेनेसा उत्तम स्कूबा डायव्हरसुद्धा आहे. लीबॉल खेळणे, पेंटिंग करणे यात तिला  रस  आहे.