‘माझ्या जागेत ओट्याचे काम का करता?’ म्हटल्यावरुन तिघांना मारहाण

0
192

सोमाटणे ,दि. २२ (पीसीबी) – ‘ही आमची जागा आहे. तुम्ही ओट्याचे काम का करता’ असे म्हटल्या वरून चार जणांनी मिळून तिघांना बेदम मारहाण केली. ही घटना बुधवारी (दि. 21) दुपारी मावळ तालुक्यातील धामणे येथे घडली. ज्ञानोबा नथू गराडे, तानाजी नथू गराडे, बाळासाहेब नथू गराडे, अमर बाळासाहेब गराडे (सर्व रा. धामणे, ता. मावळ) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत भाऊ धोंडीबा गराडे (वय 36, रा. धामणे, ता. मावळ) यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या घराच्या समोर आरोपी त्यांच्या ओट्याचे काम करत होते. त्यावेळी ही आमची जागा आहे तुम्ही ओट्याचे काम का करता असे फिर्यादी यांनी आरोपींना विचारले. त्यावरून आरोपींनी शिवीगाळ आणि दमदाटी करत फिर्यादी त्यांच्या पत्नीस आणि वडिलांना काठीने व लोखंडी गजाने मारहाण केली. यामध्ये तिघांना दुखापत झाली. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.