लांच्छनास्पद ! सावत्र भावाकडून बहिणीचा विनयभंग

0
412

चिखली, दि. २२ (पीसीबी) – सावत्र भावाने बहिणीला अश्लील शब्दात बोलून तिचा विनयभंग केला. तसेच आई व बहिणीसोबत येऊन भावाने मारहाण करून ‘तू इथे राहिलीस तर तुला मारून टाकीन’ अशी सावत्र बहिणीला धमकी दिली. ही घटना मंगळवारी (दि. 20) रात्री आणि बुधवारी (दि. 21) दुपारी भीमशक्तीनगर, चिखली येथे घडली.

पीडित 34 वर्षीय महिलेने याबाबत चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार 30 वर्षीय सावत्र भाऊ, त्याची बहीण आणि आई यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री दहा वाजताच्या सुमारास आरोपी सावत्र भाऊ फिर्यादी महिलेच्या घरासमोर आला. बहिणीला अश्लील शब्दात बोलून त्याने तिचा विनयभंग केला. त्यानंतर फिर्यादी यांच्या घराच्या दरवाजावर दगड फेकून मारला.

बुधवारी दुपारी तीन वाजता आरोपी सावत्र भाऊ त्याच्या बहीण आणि आईला घेऊन फिर्यादी यांच्या घरी आला. ‘हिला इथे राहू द्यायचे नाही. तिला येथून हाकलून द्या. तू जर इथे राहिलीस तर तुला जावे मारून टाकीन’ अशी आरोपींनी फिर्यादी यांना धमकी दिली. तसेच फिर्यादी यांना मारहाण केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. चिखली पोलीस तपास करीत आहेत.