‘महापालिकेतील सत्ताधारी भाजपचा भ्रष्टाचार उकरून काढणार!’ ; पार्थ पवार पुन्हा एकदा मैदानात

0
250

पिंपरी, दि.१४ (पीसीबी) : जसजश्या निवडणूका जवळ येत आहेत तसतस पिंपरी चिंचवड मधील राजकारण सगळ्यांच्या चर्चेचा विषय ठरतेय. पिंपरी-चिंचवड महानगरपालिका पुन्हा हाती घेण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार पुन्हा एकदा मैदानात उतरले आहेत. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पार्थ पवार हे स्वत: जातीने लक्ष घालत असून सत्ताधारी भाजपच्या पदाधिका-यांनी पदाचा गैरवापर करुन भ्रष्ट कारभार माजवला आहे. त्या जबाबदार प्रशासन आणि भ्रष्टाचारी पदाधिका-यावर कारवाईची मागणी राष्ट्रवादीचे युवा नेते पार्थ पवार यांनी केली आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी भाजपचा भ्रष्टाचार बाहेर काढून त्यांची पोलखोल करण्यासाठी पार्थ पवार तयार आहेत. त्या संबंधिचं आज पुन्हा टि्वट केलं आहे. “सिर्फ हंगामा खड़ा करना मेरा मकसद नहीं, मेरी कोशिश है कि ये सूरत बदलनी चाहिए।”, असं टि्वट पार्थ पवार यांनी केलं आहे ज्यूणे चर्चांना पुन्हा एकदा उधाण आलं आहे. तसेच पीसीएमसीमध्ये जबाबदार प्रशासन आणि फक्त त्या भ्रष्ट, “पार्टी हॉपिंग” व्यक्तींवर कारवाई करा. जे कॉर्पोरेशन चालवत आहेत, हेच मी विचारत आहे. असं पार्थ पवार यांनी म्हटले आहे. एकेकाळी पिंपरी चिंचवड हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला होता. मात्र, राष्ट्रवादीच्या सत्तेला सुरुंग लावला. आता पुन्हा भाजपच्या हातून ही सत्ता काबिज करण्यासाठी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या उपस्थितीत आजी-माजी नगरसेवक, पदाधिका-यांचा शनिवारी (16 ऑक्टोबरला) मेळाव्याचं आयोजन केलं आहे.

पार्थ पवार यांनी नुकताच पिंपरी चिंचवड शहरातील पवना-इंद्रायणी नदीतून पैसे खाण्याच्या या भ्रष्टाचाराच्या मूळापर्यंत जाणार असल्याचा इशारा दिला. आणि ‘हीच का स्मार्ट सिटी?’, असा प्रश्नही त्यांनी विचारला. पार्थ पवार आणि माजी आमदार विलास लांडे यांनी शहरातील प्रलंबित प्रश्नांबाबत लक्ष घालण्यास सुरवात केली असून चार महिन्यांवर आलेल्या महापालिका निवडणुकीच्या तोंडावर दोघेही अधिक सक्रिय झाल्याचे दिसून येत आहे. पार्थ यांच्या इशाऱ्याने भाजपला जशास तसे उत्तर देवून त्यांच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता आहे. आता येत्या दिवसात काय होईल आणि काय नाही हे आत्ताच सांगता येणे शक्य नाही.