महानगरपालिकेच्या वतीने महिलांसाठी चालविल्या जाणार व्यायामशाळा

0
251

पिंपरी, दि.२८ (पीसीबी) : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या एकूण ८२ व्यायाम शाळा असून त्यापैकी ३२ व्यायामशाळा म.न.पा.च्या वतीने चालवल्या जात असून ५० व्यायामशाळा खाजगी संस्थांना चालविण्यास देण्यात आलेल्या आहेत.

मात्र मार्च २०२० ते आजपर्यंत कोरोना प्रादुर्भाव वाढल्यामुळे महिला व नागरिक बाहेर न पडल्याने त्यांची प्रतिकार शक्ती कमी झाली आहे. त्यामुळे महिलांची प्रतिकारशक्ती वाढवण्याच्या दृष्टीने सकाळी आणि सायंकाळी १ तास असे दिवसाचे दोन तास म.न.पा.च्या व्यायामशाळेमध्ये महिलांसाठी राखीव ठेवल्यास महिला व्यायाम शाळेत येऊ शकतील. व त्यांची प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होईल. त्यामुळे म.न.पाच्या वतीने चालविल्या जाणाऱ्या व सेवाशुल्क तत्वावर चालविण्यास दिलेल्या व्यायामशाळा या महिलांसाठी सकाळी ९ ते १० आणि संध्याकाळी ४ ते ५ या राखीव वेळेत सुरु असणार आहे. तरी जास्तीत जास्त महिलांनी या व्यायामशाळेच्या लाभ घेण्याचे आवाहन पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेकडून नागरिकांना करण्यात आले आहे.