भाजपचे नगरसेवक महेश लडकत यांचे निधन

0
205

पुणे, दि. 29 (पीसीबी): भाजपचे नगरसेवक महेश लडकत यांचे सोमवारी रात्री निधन झाले. गेल्या 7 महिन्यांपासून ते आजारी होते. फुफ्फुसाचा आजार बळावल्याने त्यांचे निधन झाले. ते वय ५३ वर्षांचे होते.त्यांच्या पश्चात पत्नी, एक कन्या , २ बंधु एक भगिनी असा परिवार आहे.

गरवारे कॉलेजचे विद्यार्थ्यांचे प्रतिनिधित्व करून त्यांनी आपली राजकीय वाटचाल सुरू केली होती. पुढे पतित पावन संघ व नंतर भाजप माध्यमातून सामाजिक कार्य सुरू केले. नागरिकांची कामे करायला ते नगरसेवक नसतानाही देखील पुढाकार घेत. नवी पेठ, दत्तवाडी व राजेंद्र नगरच्या भागातील अनेक गरजू तरुणांना त्यांनी बँकेत व शिक्षण मंडळात नोकरीला लावले होते.

उद्या सकाळी साडे दहा वाजता नवी पेठेतील त्यांच्या संपर्क कार्यालयात अंत्यदर्शन ( पत्रकार भवन च्या मागे ) तर ११ वाजता वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होतील.