महात्मा गांधींना वर्णभेदी ठरवत विद्यापीठातून हटवण्यात आला पुतळा

0
698

आफ्रिका, दि. १५ (पीसीबी) – महात्मा गांधी हे वर्णभेदी होते असे ठरवून त्यांचा पुतळा रातोरात हलवण्यात आला आहे. अफ्रिकेतील घाना विद्यापीठात ही घटना घडली आहे. आफ्रीकी वंशाच्या लोकांचे हे मानणे आहे की महात्मा गांधी वर्णभेदी होते. त्याच कारणामुळे गांधींजींचा पुतळा हटवण्यात आला आहे. दोन वर्षांपूर्वी भारत आणि घाना यांच्या मैत्रीचे प्रतीक म्हणून घाना येथील विद्यापीठात महात्मा गांधींचा पुतळा बसवण्यात आला होता.

आता मात्र महात्मा गांधींना वर्णभेदी ठरवत त्यांचा पुतळा हटवण्यात आला आहे. गांधींजींना रेसिस्ट अशी उपाधी देऊन घाना विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी या पुतळ्याला कडाडून विरोध दर्शवला. विद्यापीठातून गांधींचा पुतळा हटवण्यात यावा अशी मागणी सातत्याने करण्यात आली तसेच त्यासाठी आंदोलनही सुरु झाले. त्यानंतर विद्यापीठाने हा पुतळा हटवला.

अफ्रिकेतील देश घाना या ठिकाणी असलेल्या अक्रा या राजधानीच्या शहरातील विद्यापीठामध्ये महात्मा गांधींच्या पुतळ्याविरोधात आंदोलनं करण्यात आली. तसेच पुतळा हटवण्याची मागणी करण्यात आली ज्यानंतर हा पुतळा हटवण्यात आला. गेल्या दोन वर्षांपासून पुतळा हटवण्याची मागणी करण्यात येत होती. यासाठी दोन वर्षांपासून विद्यार्थी आणि प्राध्यपकांची आंदोलने होत होती. अखेर हा पुतळा हटवण्यात आला आहे.