भोसरीत अल्पवयीन मुलीच्या घरी जाऊन विनयभंग

0
1260

भोसरी, दि. ३ (पीसीबी) – एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीच्या घरी जाऊन एका ४७ वर्षीय इसमाने विनयभंग केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना शनिवारी (दि.१) सायंकाळी पाचच्या सुमारास बालाजीनगर झोपडपट्टी येथील पिडितेच्या घरात घडली.

याप्रकरणी पिडित १४ वर्षीय मुलीने भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अकबर मुनीर शेख (वय ४७, रा. जे ब्लॉक, ३६ समोर, बालाजीनगर झोपडपट्टीसमोर एमआयडीसी भोसरी) या इसमाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  शनिवारी सायंकाळी पाचच्या सुमारास आरोपी अकबर हा पिडित मुलीच्या घरी गेला होता. यावर पिडिने अकबर याला दरवाजातून काय काम आहे? अशी विचारणा केली असता अकबरने पिडितेची ओढणी ओढून तिच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करुन विनयभंग केला. याप्रकरणी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकबर विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अकबर याला अद्याप अटक करण्यात आलेली नाही. भोसरी एमआयडीसी पोलीस अधिक तपास करत आहेत.