‘मै भी चायवाला बन गया’; जितेंद्र आव्हाड मोदींना देणार आव्हान?  

0
620

मुंबई, दि. ३ (पीसीबी) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची २०१४च्या लोकसभा निवडणुकीत चहावाला अशी प्रतिमा भलतीच लोकप्रिय ठरली होती. एक चहावाला पंतप्रधान बनू शकतो, याचे अप्रुव्ह जनतेमध्ये आजही कायम आहे. दरम्यान राष्ट्रवादीचे नेते व ठाण्याचे आमदार  जितेंद्र आव्हाड यांनी मोदींना आव्हान तयार केले आहे. कारण जितेंद्र आव्हाड सुद्धा चहावाले बनले आहेत.

जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर एक व्हीडिओ शेअर केला आहे. यामध्ये ते चहा बनवताना दिसत आहेत. हा व्हिडीओ सध्या व्हायरल होत असून त्यामध्ये ते चहाच्या टपरीवर स्वत: चहा बनवताना दिसत आहेत.

सध्या तंदुर चहा सगळीकडे लोकप्रिय झाला आहे. ठिकठिकाणावरील टपरीवर तंदूर चहाचे फलक झळकत आहेत, अशा एका टपरीवर  जितेंद्र आव्हाडांना देखील तंदूर चहाची चव चाखण्याची तलफ  आली. त्यांनी टपरीवर जाऊन स्वतः तंदूर चहा बनवण्याची पध्दत जाणून घेतली. तसेच चहा तयार करायला सुरूवात केली.  फक्कड चहा तयार झाल्यानंतर ‘मै भी चायवाला बन गया’ असे जितेंद्र आव्हाड म्हणाले.