मराठा आरक्षणाविरोधात याचिका; याचिकाकर्त्यांना अज्ञातांकडून धमकीचे फोन

0
1360

मुंबई, दि. ३ (पीसीबी) – मराठा आरक्षणाविरोधात याचिका दाखल करण्याच्या तयारीत असलेल्या अॅड. गुणरतन सदावर्ते आणि अॅड. जयश्री पाटील यांना  अज्ञात व्यक्तींकडून धमक्यांचे फोन येत आहेत. याप्रकरणी त्यांच्याकडून पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.  गेल्या दोन दिवसांपासून या दोघांनाही निनावी  फोन नंबरवरुन धमक्यांचे फोन येत आहेत. याप्रकरणी त्यांनी माता रमाईबाई आंबेडकरनगर आणि भोईवाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

पोलिसांनी या दोघांच्या घराजवळ पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे.  आज (सोमवारी) मराठा आरक्षणाविरोधात याचिका दाखल करण्यात येणार आहे. ५० टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षण देऊ नये, असा सर्वोच्च न्यायालयाने १९९२ मध्ये निकाल दिला आहे.  त्या आधारावर राजस्थान सरकारने दिलेले आरक्षण रद्दबादल ठरवण्यात आले होते. महाराष्ट्रातही ही मर्यादा ओलांडण्यास याचिकाकर्त्यांनी विरोध दर्शवला आहे.