भाजपमधील एकच व्यक्ती मला ओरडू शकते; मोदींचा खुलासा

0
813

इंदोर, दि. १३ (पीसीबी) – लोकसभा अध्यक्ष म्हणून सुमित्रा ताईंनी कुशलता आणि संयमीपणे काम संभाळले आहे. त्यामुळे त्यांनी सर्वांवर स्वत:ची अशी छाप सोडली आहे. तुम्ही सर्व मला पंतप्रधान म्हणून ओळखता पण  भाजपमध्ये  मला कोणी ओरडू शकत असेल तर त्या ताई आहेत, अशा शब्दांत पंतप्रधान मोदी यांनी लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांच्याविषयी खुलासा केला आहे.

मोदी इंदौर येथे प्रचार सभेत बोलत होते. यावेळी त्यांनी सुमित्रा महाजन यांच्या कामाचे तोंड भरून कौतुक केले. भाजपमध्ये केवळ महाजनच अशा आहेत, ज्या मला ओरडू शकतात, असे मोदी म्हणाले.

मोदी म्हणाले की , मी आणि ताईंनी भाजप संघटनेचे कार्य केले आहे. त्यामुळे कार्याप्रती त्यांचे समर्पण मी पाहीले आहे. त्यामुळे इंदौरच्या विकासातील ताईंचे कोणतेही स्वप्न अपूर्ण राहणार नाही,  असे मी आश्वासन देतो.  सुमित्रा महाजन इंदौरच्या जागेहून १९८९ ते २०१४  दरम्यान सलग आठ वेळा निवडणूक जिंकल्या आहेत. पण ७५ वर्षाहून अधिक वयाच्या नेत्यांना निवडणूक लढण्याचा भाजपचा नियम आहे. त्यानंतर सुमित्रा महाजन यांनी आपण निवडणूक लढणार नसल्याचे स्वत: हून जाहीर केले होते, असे मोदींनी सांगितले.