मोदींना भाजप नेत्यांच्या बायकाही घाबरू लागल्या- मायावती

0
421

लखनऊ, दि. १३ (पीसीबी) –  पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करताना बसपा अध्यक्षा मायावती यांची जीभ घसरली. राजकीय लाभासाठी पत्नी सोडणारे मोदी माता-भगिनींचा आदर काय करणार? अशी टीका करतानाच मोदींनी त्यांच्या पत्नीला सोडले. त्यामुळे ते आपल्या पतींनाही आपल्यापासून दूर करतील, अशी चिंता भाजप नेत्यांच्या बायकांना भेडसावत असून आपले पती मोदींच्या संपर्कात येऊ नयेत, असे या भाजप नेत्यांच्या पत्नींना वाटत असल्याचे, मायावती म्हणाल्या. मायावतींच्या या विधानाने खळबळ उडाली असून त्यावर भाजपने टीका केली आहे.

अलवार बलात्कार प्रकरणावरून मायावती आणि नरेंद्र मोदी यांच्यात खडाजंगी सुरू आहे. याप्रकरणावरून रविवारी मायावतींनी मोदींवर निशाणा साधला होता. आज पुन्हा पत्रकार परिषद घेऊन मोदींवर टीका करताना मायावतींची जीभ घसरली. अलवर येथील दलित महिलेवरील बलात्कार प्रकरणी मोदींनी आधी एक शब्दही उच्चारला नव्हता. मी बोलल्यानंतर लगेचच मोदींनी त्यावर प्रतिक्रिया दिली. याप्रकरणाचे राजकारण करण्याचा किळसवाणा प्रकारही त्यांनी केला. केवळ राजकीय लाभासाठी त्यांनी हे केले. ही अत्यंत लज्जास्पद बाब आहे. आपल्या निर्दोष पत्नीला सोडून देणाऱ्यांकडून दुसऱ्यांच्या माता-भगिनींच्या आदराची अपेक्षा तरी कशी करता येईल? अशी टीकाही त्यांनी केली.