भाजपच्या बैठकीला गैरहजर, रात्री १२ नंतर पंकजा मुंडेंचं ट्वीट

0
730

मुंबई,दि.१०(पीसीबी) – भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे भाजपच्या मराठवाडा विभागीय बैठकीला काल आजारी असल्यामुळे गैरहजर होत्या. त्यानंतर रात्री बारा वाजून सात मिनिटांनी ट्वीट करत पंकजा मुंडे यांनी येत्या बारा तारखेला गोपीनाथ गडावर उपस्थित राहण्याचं आवाहन समर्थकांना केलं आहे.

१२ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता आपल्या लोकनेत्याच्या स्मरणार्थ आपल्या सर्वांना गोपीनाथ गड येथे आमंत्रण. तुम्ही सारे या.. हा दिवस आपला स्वाभिमान दिवस आहे आहे. तुम्ही ही या.. वाट पहाते, असं ट्वीट पंकजा मुंडे यांनी केलं आहे.

तब्येत ठीक नसल्यामुळे पंकजा मुंडे भाजपच्या मराठावाडा विभागीय बैठकीला उपस्थित राहिल्या असून त्यांनी माझी परवानगी घेतली आहे, अशी माहिती भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली होती.