आपली अर्थव्यवस्था ‘ आजारी ’ आहे, असे म्हणत शिवसेनेने केला केंद्र सरकारवर हल्लाबोल

0
463

महाराष्ट्र, दि.१० (पीसीबी) – नरेंद्र मोदी सरकारच्या सामाजिक आणि राजकीय धोरणांसंबंधी बोलताना त्यांनी, “सरकारने राष्ट्रीय आणि धार्मिक महापुरुषांचे मोठे पुतळे उभारण्याऐवजी आधुनिक शाळा आणि विद्यापीठे उभी केली पाहिजेत. यामुळे लहान मुलांना चांगलं शिक्षण देत त्यांना सहिष्णू आणि इतरांप्रती आदर व्यक्त करणारे म्हणून घडवण्यास मदत मिळेल. तसेच उद्याच्या स्पर्धात्मक जगात ते स्वत:चा टिकाव धरु शकतील. भारताच्या आर्थिक विकासाला आहोटी लागली असून, अर्थव्यवस्थेत आजाराची लक्षणे दिसू लागली आहेत. अशा अवस्थेत पंतप्रधान कार्यालयात अधिकारांचे केंद्रीकरण आणि अधिकारहीन मंत्री ही स्थिती अर्थव्यवस्थेसाठी अपायकारक आहे” असं मत रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर डॉ. रघुराम राजन यांनी व्यक्त केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यानंतर शिवसेनेने देशाच्या अर्थव्यवस्थेवरून केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. रघुराम हे अर्थव्यवस्थेचे निष्णात डॉक्टर आहेत व त्यांनी केलेली नाडीपरीक्षा योग्य आहे. अर्थात देशाच्या अर्थव्यवस्थेस लकवा मारला हे स्पष्ट दिसत आहे. विद्यमान सरकार तज्ञांचे ऐकण्याच्या मनःस्थितीत नाही व देशाची अर्थव्यवस्था म्हणजे त्यांच्या दृष्टीने शेअर बाजाराचा ‘सट्टा’ झाला आहे, असे म्हणत शिवसेनेने केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे.

#अग्रलेख ।।जय जय रघुराम समर्थ।।देशाची अर्थव्यवस्था देशपातळीवर कशी काम करते यापेक्षा राज्याच्या पातळीवर कशी काम करते…

Gepostet von Sanjay Raut am Montag, 9. Dezember 2019