स्वप्नात बडबडायचो मुख्यमंत्री आमचाच होणार,घरी बोलायचे वेडं लागलंय का? – संजय राऊत

0
807

नवी दिल्ली,दि.१०(पीसीबी) – मी एकटा रोज सकाळी उठलो की, स्वप्नात पण बडबडायचो. मुख्यमंत्री आमचाच होणार. मला घरी बोलायचे वेड लागलं आहे का?, असं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सांगितलं आहे. ते दिल्लीमध्ये बोलत होते.

दिल्लीत अधिवेशनासाठी जमलेल्या महाराष्ट्रातील खासदारांच्या स्नेह भोजनावेळी संजय राऊत यांनी सर्व खासदारांशी अनोपचारिक संवाद साधला. यावेळी राऊतांनी अनेक किस्से सांगितले.

सामनामध्ये आलो की चिंता करु नका, मुख्यमंत्री आमचाच होणार. बाहेर गेलो तरी उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री होणार असे सांगायचो. शेवटपर्यंत ही गोष्ट आपण पुढे नेली. हा सिनेमा म्हणा किंवा एक भयपट म्हणा. रोमांचक किंवा रहस्यपट म्हणा, असंही संजय राऊत यांनी यावेळी सांगितलं आहे.