बेंगळुरु येथे सरावा दरम्यान दोन विमानांची अपसात टक्कर; एका वैमानिकाचा मृत्यू

0
640

बेंगळुरु, दि. १९ (पीसीबी) – कर्नाटकातील बेंगळुरु येथे एअर शोपूर्वी सराव करत असताना आज (मंगळवार) सकाळी दोन सूर्यकिरण विमानांमध्ये टक्कर झाली. या घटनेत एका वैमानिकाचा मृत्यू झाला. तर जण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना यालहंका एअरबेसवर घडली.

यालहंका एअरबेसवर बुधवारपासून एअर शोला सुरुवात होणार आहे. या एअर शोमध्ये विमानांच्या चित्तथरारक हवाई कसरती पाहायला मिळतील. यापार्श्वभूमीवर मंगळवारी विमानांचा सराव सुरु होता. सरावासाठी उड्डाण घेत असताना दोन सूर्यकिरण विमानांची अपसातच टक्कर झाली. यानंतर दोन्ही विमान एअरबेसच्या आवारातच कोसळली. या दुर्घटनेत एका वैमानिकाचा मृत्यू झाला. एक जण जखमी झाला आहे. सूर्यकिरण ही भारतीय हवाई दलातील एक तुकडी असून या विमानांचा वापर हवाई कसरतींसाठी केला जातो. १९९६ ते २०११ दरम्यान या विमानांचा वापर केला गेला. यानंतर २०१५ मध्ये या विमानांमध्ये दुरुस्ती करुन त्यांचा पुन्हा वापर सुरु झाला. या ताफ्यात सध्या नऊ विमाने आहेत.