बिभीषणाला जशी रावणाची लाज वाटायची, तशीच मला रावसाहेब दानवेंची लाज वाटते – पुंडलिक दानवे

0
1007

जालना, दि. ९ (पीसीबी) – माझे वय ९२ वर्षे आहे, तरीही हरकत नाही, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी  भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंविरोधात निवडणूक लढण्यास सांगितले, तर मी लढवण्यास तयार आहे. ही लढाई गुरु शिष्याची लढाई नाही, तर राम विरूद्ध रावणाची लढाई होईल, असे रावसाहेब दानवे यांचे राजकीय गुरु पुंडलिक दानवे यांनी केले आहे. तसेच  बिभीषणाला जशी रावणाची लाज वाटायची, तशीच मला रावसाहेब दानवेंची लाज वाटते, असेही  ते म्हणाले.

दानवे यांनी संसद भवनाला किती खांब आहेत, हे बरोबर सांगितले, तरी मी त्यांच्या विरोधात राजकारण करायचे सोडून देईन असेही पुंडलिक दानवे यांनी म्हणाले. दानवे हे रावसाहेब दानवे यांचे राजकीय गुरु आहेत. मात्र, आता पुंडलिक दानवे यांनीच रावसाहेब दानवेंविरोधात शड्डू ठोकला आहे.

पुंडलिकराव दानवे यांनीच रावसाहेब दानवेंना राजकारणात आणले, तसेच अनेक निवडणुकांमध्ये त्यांनी रावसाहेब दानवेंना मदतही केली. मात्र रावसाहेब दानवे हे सारे काही विसरले, अशी खंतही पुंडलिक दानवेंनी व्यक्त केली. पुंडलिकराव दानवे जालना जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते आहेत. १९७७ मध्ये ते जनता दलाकडून   खासदार म्हणून निवडून आले होते. त्यानंतर ते भाजपच्या तिकिटावर चारवेळा निवडणूक लढले, मात्र, एकदाच त्यांना जिंकता आले.