प्रा. संगमेश भैरगोंड यांचे निधन; मंगळवारी भोसरी येथे अंत्यसंस्कार

0
464

पिंपरी, दि. १४ (पीसीबी) – भोसरी येथील संगमेश्वर एज्युकेशन ट्रस्ट संचलित सिध्देश्वर हायस्कूलचे संस्थापक प्रा. संगमेश अण्णाप्पा भैरगोंड (वय-७८) यांचे रविवारी दुपारी दीर्घ आजारपणाने वृध्दापकाळाने निधन झाले. त्यांच्या मागे दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. एक मुलगा अमेरिकेत आणि दुसरा इंग्लंडला आहे. त्यांच्या पार्थिवावर मंगळवारी भोसरी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

भोसरी मध्ये १९७२ मध्ये त्यांनी इंग्रजी माध्यमाची पहिली अशी सिध्देश्वर शाळेची त्यांनी स्थापना केली. पिंपरी चिंचवड शहरात वीरशैव लिंगायत समाजाचे संघटन करण्यात त्यांचे मोठे योगदान होते. महाराष्ट्र शासनाच्या संत गाडगेबाबा स्वच्छता अभियानात परिक्षक म्हणून त्यांनी अनेकदा काम पाहिले. महापालिकेच्या विविध उपक्रमांतही त्यांचे सहकार्य असायचे. सिध्देश्वर हायस्कुलमधील विद्यार्थ्यांना वृत्तपत्र वाचनाची आवड निर्माण व्हावी म्हणून वृत्तपत्र वाचन, कात्रण स्पर्धांचा उपक्रम त्यांनी सुरू केला. त्यांचेच अनुकरण अन्य शाळांनी केले. शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांच्या निधानबद्दल हळहळ व्यक्त केली.