प्रणव मुखर्जींच्या प्रकृतीत सुधारणा नाहीच

0
421

नवी दिल्ली, दि. १९ (पीसीबी) : माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या प्रकृतीत कोणतीही सुधारणा दिसत नाही. रुग्णालयाने जारी केलेल्या मेडिकल बुलेटिनमध्ये सांगितलं आहे की, “प्रणव मुखर्जी यांची प्रकृती खालावली असून फुफ्फुसांमध्ये इफेक्शनची प्राथमिक लक्षणे दिसत आहेत. ते अजूनही व्हेंटिलेटरवर आहेत. डॉक्टरांचं विशेष पथक त्यांच्यावर देखरेख ठेवून आहे.

84 वर्षीय प्रणव मुखर्जी यांना 10 ऑगस्ट रोजी दिल्ली छावणीच्या सैन्य रुग्णालयात दाखल केलं होतं. मेंदूत रक्ताच्या गाठी झाल्यानंतर त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. परंतु त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली नाही. शिवाय त्यांच्या कोरोना चाचणीचा अहवालही पॉझिटिव्ह आला होता.

स्वत: प्रणव मुखर्जी यांनी 10 ऑगस्ट रोजी ट्वीट करुन याबाबत माहिती दिली होती. त्यांनी लिहिलं होतं की, “वेगळ्या वैद्यकीय चाचणीसाठी रुग्णालयात आलो होतो. इथे कोरोनाची चाचणी केला असता अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. मागील आठवड्यात माझ्या संपर्कात आलेल्या सगळ्यांना विनंती आहे की, त्यांनी आयसोलेट व्हावं आणि कोरोना चाचणी करावी.”