प्रचाराला येताना पाठीला तेल लावून या; शिवसैनिकाचे नेत्यांना पत्र

0
384

मुंबई, दि. ३० (पीसीबी) – शिवसेनेमध्ये पैसे घेऊन पदे दिली जात आहेत.  निष्ठावंत शिवसैनिकांना पक्षात  डावलून त्यांना किंमत  दिली जात नाही, असा आरोप उल्हासनगरमधील  एका शिवसैनिकाने केला आहे. शिवसेना नेत्यांना एक पत्र लिहून त्यांने आपली नाराजी व्यक्त  केली आहे.  पुढील वेळी प्रचाराला येताना पाठीला तेल लावून या, असा इशारा त्याने पत्रात  दिला आहे.