बीडमध्ये उद्धव ठाकरेंचा साडी-चोळी घातलेला प्रतीकात्मक पुतळा राष्ट्रवादीने जाळला 

0
952

बीड, दि. ३० (पीसीबी) – राष्ट्रवादीचे नेते व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याविषयी अवमानकारक अग्रलेख लिहीण्याच्या निषेधार्थ बीडमध्ये राष्ट्रवादीचे जिल्हा परिषद सदस्य संदीप क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने करण्यात आली. यावेळी शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे मुर्दाबादच्या घोषणा देत नगर रोडवरील शिवाजी चौकात उद्धव ठाकरे यांचा साडी-चोळी घातलेला प्रतीकात्मक पुतळा जाळण्यात आला. तसेच संदीप क्षीरसागर यांनी पुतळ्याला कोल्हापुरी चप्पलचे फटके मारुन निषेध नोंदवला.  

यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी ‘इट का जवाब पत्थरसे’ म्हणत उद्धव ठाकरे मुर्दाबादच्या घोषणा देत कोल्हापुरी चपलांचे फटके मारले. त्यानंतर  त्यांचा साडी घातलेल्या पुतळ्याला जोडे मारुन दहन करण्यात आले. यावेळी उद्धव ठाकरे मुर्दाबाद… अशी  घोषणाबाजी करण्यात आली.

शिवसेनेच्या नेत्यांनी अजित दादा पवार बीडमध्ये आल्यास जिवंत जाळू, असे म्हटले होते. यावर   संदीप क्षीरसागर यांनीही अशा धमकीला बीडमधील बारीक पोरगंही भीत नाही. पवारांचे सोडा आधी आमच्यासमोर येण्याची हिंमत तरी तुमच्यात आहे का? आणि ऐवढीच जाळपोळीची खुमखुमी असेल तर लक्षात ठेवा, राष्ट्रवादीचा माझ्यासारखा एकटा कार्यकर्ताच तुमच्या संपूर्ण बीडच्या शिवसेनेला पुरून उरेन, असे प्रत्युत्तर दिले.