पेटत्या चितेत उडी घेऊन मनोरुग्ण तरुणाची आत्महत्या

0
620

नागपूर, दि. २ (पीसीबी) – पेटत्या चितेमध्ये उडी घेऊन एका मनोरुग्ण तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना शनिवारी (दि.१) सायंकाळी सहाच्या सुमारास एमआयडीसी पोलीस ठाणे परिसरात घडली.

महेश मारुती कोटांगले (वय ३२, रा. जायताला, आंबेडकरनगर) असे मृत मनोरुग्ण तरुणाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत महेश हा मनोरुग्ण होता. शनिवारी संध्याकाऴी सहाच्या सुमारास त्याने एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या परिसरात असलेल्या स्मशान भुमीतील पेटत्या चितेमध्ये उडी घेतली. हे समजताच त्या परिसरात खेळणारी मुले ओरडत बाहेर आली. यावेळी लोकांनी स्मशानभुमीत धाव घेतली. मात्र तोवर महेश जळून खाक झाला होता.  महेश मजुरीचे काम करायचा गेल्या तीन वर्षांपासून त्याच्या मनावर परिणाम झाला होता.