ब्राझीलचा फुटबॉलपटू नेमारवर बलात्काराचा आरोप

0
643

ओ दी जनेरो,  दि. २ (पीसीबी) – ब्राझीलचा स्टार फुटबॉलपटू नेमार ज्युनिअर याने  पॅरिसमधील एका हॉटेलमध्ये  दारुच्या नशेत बलात्कार केला, असा आरोप एका महिलेने केला आहे. तर  महिलेने केलेला आरोप खोटा असल्याचे नेमारचे वडील आणि मॅनेजरने सांगितले आहे.  नेमारला ब्लॅकमेल करण्यासाठीच हा आरोप केल्याचे त्यांनी म्हटले आहे. 

साओ पाउलो पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मारहाण करून बलात्कार केल्याचा आरोप  या महिलेने केला आहे. महिलेच्या तक्रारीची प्रत गोपनीय असल्याचे सांगून पोलिसांनी ती देण्यास नकार दिला आहे. पीडित महिला ब्राझीलची आहे. सोशल मीडियावरून नेमार आणि या महिलेची ओळख झाली होती. सोशल मीडियावर चॅटिंग करताना नेमारने पीडितेला पॅरिसला येऊन भेट असे सांगितले. त्यानुसार ती पॅरिसला हॉटेलात थांबली. नेमार दारुच्या नशेत हॉटेलवर आला. त्या दोघांमध्ये गप्पा झाल्या. त्यानंतर नेमारने मारहाण करत तिच्यावर बलात्कार केला, असा आरोप आहे.

नेमारवरील आरोप खोटे आहेत. तो अशा प्रकारचा गुन्हा करूच शकत नाही. त्याला ब्लॅकमेल करण्यासाठीच हा आरोप केला आहे. आमच्याकडे सर्व पुरावे आहेत आणि ते वकिलांकडे दिलेले आहेत, असे त्याचे वडील नेमार सांतोस यांनी सांगितले.