भारतीय संघाला धक्का; विराट कोहलीला दुखापत

0
490

नवी दिल्ली, दि. २ (पीसीबी) – भारतीय संघाचा विश्वचषकातील पहिला सामना ५ जूनरोजी दक्षिण आफ्रिकेसोबत होणार आहे.  त्यापूर्वीच भारतीय संघाला  धक्का बसला आहे.  भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली सरवादरम्यान जखमी झाला आहे.  आज (शनिवारी) सराव करताना विराट कोहलीच्या अंगठ्याला दुखापत झाली आहे.

विराट कोहलीच्या अंगठ्यावर संघाचे फिजिओ पॅट्रीक फराहत यांनी तात्काळ उपचार केले. पॅट्रीक फराहत यांनी विराटच्या आंगठ्यावर स्प्रे मारुन प्राथमिक उपचार केले. त्यानंतर कोहलीने सराव अर्धवट सोडून मैदानाबाहेर गेला. संघ व्यवस्थापनने विराट कोहलीच्या दुखापतीबद्दल अद्याप कोणताही खुलासा  केलेला नाही.

विराट कोहलीची दुखपत किती गंभीर आहे हे अद्याप समजू शकले नाही. मात्र, पहिल्या सामन्यापूर्वी कर्णधाराला दुखापत झाल्यामुळे चिंतेचे वातावरण आहे. विजय शंकर दुखापतीतून सावरला आहे. तर केदार जाधवची अजूनही दुखापतीतून सावरत आहे. त्यातच कोहलीला झालेली दुखापत म्हणजे भारतासाठी मोठी चिंतेची बाब आहे.