पुण्यात चारित्र्याच्या संशयावरून पत्नीवर चाकून वार करून पतीची आत्माहत्या

0
787

पुणे, दि.२८ (पीसीबी) – चारित्र्याच्या संशयावरून पती आणि पत्नीमध्ये जोरदार भांडण झाले. त्यानंतर पतीने पत्नीवर वार करून स्वत: पंधराव्या मजल्यावरून उडी मारून आत्माहत्या केली.ही घटना आज (शुक्रवार) महंमदवाडी पेबल पार्क सोसायटीमध्ये घडली.

सुभाषचंद्र अग्रवाल (वय६५) असे आत्माहत्या केलेल्या व्यक्तिचे नाव आहे. तर, जखमी झालेल्या पत्नीचे नाव रेखा अग्रवाल असे आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महंमदवाडी परिसरातील पेबल पार्क सोसायटीमध्ये पंधराव्या  मजल्यावर राहणारे सुभाषचंद्र अग्रवाल आणि त्यांच्या पत्नी रेखा यांच्यामध्ये सतत भांडणे व्हायचे. आज देखील त्या दोघांमध्ये जोरदार भांडण झाले होते. यावेळी संतप्त झालेल्या सुभाषचंद्र यांनी पत्नीवर चाकुने वार केले, यामुळे पत्नी रेखा ह्या रक्ताच्या थारोळ्यात पडल्या. त्यानंतर सुभाषचंद्र यांनी त्यांच्या घराच्या गॅलरीमधुन उडी मारून आत्महत्या केली. या घटनेत त्यांचा जागीच मृत्यू झाला.जखमी रेखा यांच्यावर एका खाजगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत.