पिंपरी-चिंचवडमध्ये शिवसेनेला रसातळाला पोहोचवून डॉ. अमोल कोल्हे आता राष्ट्रवादीत!

0
722

मुंबई, दि. १ (पीसीबी) – छत्रपती संभाजी राजेंच्या भूमिकेमुळे प्रसिद्ध झालेले अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांनी शिवसेनेला सोडचिठ्ठी देत शुक्रवारी (दि. १) राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, ज्येष्ठ नेते व आमदार छगन भुजबळ, विधीमंडळ पक्षनेते अजित पवार, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत मुंबईत हा प्रवेश सोहळा पार पडला. दरम्यान, डॉ. अमोल कोल्हे हे शिवसेनेचे पिंपरी-चिंचवड शहर संपर्कप्रमुख होते. त्यांच्याच पदाच्या काळात शिवसेना शहरात रसातळाला पोहोचली. त्याची नैतिक जबाबदारी स्वाकीरून त्यांनी महापालिका निवडणुकीनंतर हे पद सोडले.