पाक अब्जाधीशाच्या मुलीच्या लग्नात मिका सिंगचा परफॉर्मन्स;  सोशल मीडियावर जोरदार टीका

0
569

नवी दिल्ली, दि. १३ (पीसीबी) – भारत-पाकिस्तान संबंधात सध्या कमालीचा तणाव निर्माण झाला असताना भारतीय गायक मिका सिंग याने पाकिस्तानात जाऊन परफॉर्म केल्यामुळे सोशल मीडियावर जोरदार टीका होत आहे. जम्मू-काश्मीरमधून अनुच्छेद ३७० हटवल्यापासून भारत-पाकिस्तानमध्ये सुरू असलेल्या तणावाचा परिणाम आता कलाक्षेत्रावरही होताना दिसत आहे.

मिकाने कराचीतल्या एका अब्जाधीशाच्या मुलीच्या लग्नात परफॉर्म केल्याचे वृत्त आहे. संबंधित पाक अब्जाधीशाचे पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांच्याशी जवळचे संबंध असल्याचे म्हटले जात आहे. हा लग्नसोहळा ८ ऑगस्ट रोजी होता. सोशल मीडियावर मिकाच्या परफॉर्मन्सचा व्हिडीओ व्हायरल होत असून त्याच्यावर जोरदार टीका होत आहे.

मिकाने पाकिस्तानात जाऊन परफॉर्म केल्यामुळे भारतीय चाहते ट्विटरवर तीव्र नाराजी व्यक्त करत आहेत. मिकाने या परफॉर्मन्ससाठी जवळपास दीड लाख रुपये मानधन घेतल्याचे समजते आहे.