भारताची कुस्तीपटू बबिता फोगट, महावीर फोगट यांचा भाजपमध्ये प्रवेश

0
654

नवी दिल्ली, दि. १२ (पीसीबी) – भारताची  कुस्तीपटू बबिता फोगट  व तिचे वडील महावीर फोगट यांनी आज ( सोमवारी) केंद्रीय मंत्री किरण रिजिजू यांच्या उपस्थितीत   भाजपमध्ये  प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी भाजपचे कार्यकारी अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचीही भेट घेतली.

कलम ३७० हटवल्यानंतर बबिताने ट्विट करून म्हटले होते की,  देशाला स्वातंत्र्य मिळाल्याचा क्षण पहाण्याचे माझे भाग्य नव्हते.  मात्र, काश्मीरला ‘कलम ३७०’ आणि ‘३५ अ’ पासून मुक्ती मिळल्याचे पाहणे हे माझे भाग्य असेल. भारत माता की जय.”

दरम्यान, हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी मुलींबाबत केलेल्या कथीत वादग्रस्त विधानाचे समर्थनही बबिताने केले होते. तिने म्हटले होते की, मुख्यमंत्री खट्टर यांनी मुलींचा अपमान होईल असे कोणतेही विधान केलेले नाही, माध्यमांनी कृपया त्यांचे विधान चुकीच्या पद्धतीने जनतेसमोर मांडू नये.