परभणीत राष्ट्रवादीला धक्का ; १३ नगरसेवकांचे तडकाफडकी राजीनामे

0
1211

परभणी, दि. २ (पीसीबी) – परभणी महापालिकेतील राष्ट्रवादीच्या १३ नगरसेवकांनी तडकाफडकी आपले राजीनामे  दिले आहेत. ग्रामीण परभणीचे राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष आमदार बाबाजानी दुर्राणी यांच्या मनमानी कारभाराला कंटाळून सर्वांनी राजीनामे  दिल्याचे सांगितले जात आहे. यामुळे लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसला  मोठा धक्का बसला आहे.

परभणी महापालिकेमध्ये राष्ट्रवादीचे १८ नगरसेवक आहेत. त्यापैकी १३ नगरसेवकांनी आपले राजीनामे शहर जिल्हाध्यक्ष स्वराज परिहार यांच्याकडे  दिले आहेत.

परभणी महापालिकेतील स्वीकृत सदस्य विष्णू नवले यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नीला हे पद देण्याचा ठराव राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी घेतला होता. मात्र बाबाजानी दुर्राणी यांनी ऐन वेळेला पक्षाशी संबंध नसलेल्या अतिक इनामदार यांचा अर्ज दाखल केला. त्यानंतर राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी संताप व्यकत् करून राजीनामा देण्याचा निर्णय घेतला होता.