पंढरपूर-सोलापूर रस्त्यावरील भीषण अपघातात एकाच कुटुंबातील ६ जण ठार

0
1544

पंढरपूर, दि. २ (पीसीबी) – भरधाव  मारुती कार आणि एसटी बस यांची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात ६ जण ठार झाले. हा अपघात पंढरपूर-सोलापूर रस्त्यावर आज (शनिवार) सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास झाला. या अपघातात  एक लहान मुलगी गंभीर जखमी झाली आहे.

अपघातात ठार झालेले सर्वजण मुंबईतील रहिवाशी असल्याचे सांगितले जात आहे. मुंबईतील सुरेश कोकणे यांचे हे कुटुंबीय असल्याचे समजते. अपघातात उपचारासाठी हलविलेल्या लहान मुलाचाही मृत्यु झाला आहे. जिवंत असलेल्या एकमेव लहान मुलीस उपचारासाठी सोलापूरमधील रूग्णालयात हलवण्यात आले आहे.