नेहरुनगर बेकायदेशीर तोड झाल्याचा वृक्षप्रेमींचा आरोप

0
196

पिंपरी, दि. १५ (पीसीबी) – पिंपरी नेहरुनगर येथील हॉकी स्टेडियमच्या बाजुची छोटी-मोठी 100 हून अधिक वृक्षांची बेकायदेशीर तोड केल्याचा आरोप वृक्षप्रेमींनी केला आहे.

पिंपरी-चिंचवड शहरातील अवैध वृक्षतोड थांबता थांबेना झाली आहे. महापालिकेच्या उद्यान विभागाच्या दुर्लक्षामुळे बेकायदेशीरपणे वृक्षतोड सुरू असल्याचा आरोप वृक्षप्रेमींकडून सातत्याने केला जातो. महापालिकेकडून परवानगी घेतली जाते काही झाडे तोडण्याची प्रत्यक्षात मात्र अनेक मोठ्या झाडांची कत्तल केली जाते. अनेकदा छाटणीची परवानगी असते. प्रत्यक्षात बुंद्यापासून झाडे तोडली जात असल्याचे दिसून येत आहे. छाटणीच्या नावाखाली झाडांची कत्तल केली जात आहे.

हॉकी स्टेडियम येथील छोटी-मोठी 100 हून अधिक झाडे तोडली आहेत. गेल्या चार ते पाच दिवसांपासून झाडे तोडली जातात. अधिकृत ठेकेदार नाही. खासगी व्यक्तीने येऊन झाडे तोडली आहेत. त्यामुळे बेकायदेशीर वृक्षतोड झाली आहे, असे वृक्षप्रेमी प्रशांत राऊळ यांनी सांगितले. तर, उद्यान विभागाचे उपायुक्त सुभाष इंगळे म्हणाले, ”झाडे तोडण्यास परवानगी दिलेली आहे. पण, कोणती झाडे तोडण्यास परवानगी दिलेली आहे हे सांगता येणार नाही. उद्यान विभागाचे कर्मचारी तिथे गेले आहेत”.