निगडीत रस्त्याच्या कडेला पार्क केलेली दुचाकी चोरीला

0
454

निगडी, दि. ९ (पीसीबी) – रस्त्याच्या कडेला पार्क केलेली दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरुन नेली. ही घटना भक्ती-शक्ती चौकाकडून टिळक चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील इन्सपेरिया बिल्डिंगसमोर घडली.

याप्रकरणी दुचाकी मालक नवनाथ शांताराम सोळसे (वय २९, रा. दिनदयाळ शाळेजवळ, वल्लभनगर, पिंपरी) यांनी सोमवारी (दि.८) निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २६ जुन रोजी भक्ती-शक्ती चौकाकडून टिळक चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील इन्सपेरिया बिल्डिंगसमोर फिर्यादी नवनाथ यांनी त्यांची शाईन दुचाकी (क्र. एमएच/१४/सीआर/९५२१) ही हॅन्डल लॉक करुन पार्क केली होती. यावेळी अज्ञात चोरट्याने बनावट चावीच्या सहाय्याने दुचाकीचे लॉक उघडून ती चोरुन नेली. यामुळे नवनाथ यांचे ४० हजारांचे नुकसान झाले आहे. निगडी पोलिस चोरट्यांचा शोध घेत आहेत.