कर्नाटकातील राजकीय नाट्य सुरूच; आणखी एका आमदाराचा राजीनामा

0
393

कर्नाटक, दि, ९ (पीसीबी) – कर्नाटकातील राजकीय नट्य सुरूच आहे. आधी १३ आमदारांनी, नंतर सरकारमधील एका अपक्ष मंत्र्याने राजीनामा दिल्यानंतर आता कुमारस्वामी सरकारमधील सर्वच्या सर्व मंत्र्यांनी राजीनामा दिला आहे. त्यामुळे कुमारस्वामी सरकार संकटात सापडले आहेच. कर्नाटकात काँग्रेसला आणखी एक धक्का बसला आहे. ज्येष्ठ नेते रोशन बेग यांनीही आमदारकीचा राजीनामा दिल्याने कॉंग्रेस आणखी अडचणीत आली आहे.

दरम्यान,या नाट्यात आता सस्पेंन्स आणखी वाढला असून विधानसभा अध्यक्ष रमेश कुमार यांनी काँग्रेस – जेडीएसच्या १४ आमदारांचे राजीनामे नामंजूर केले आहेत. विधानसभा अध्यक्षांच्या या निर्णयामुळे आता कर्नाटकातील राजकीय पेच कायम आहे.