शरद पवारांच्या ‘त्या’ नातेवाईकांने दिली होती, मला जिवे मारण्याची धमकी – अण्णा हजारे

0
564

मुंबई, दि, ९ (पीसीबी) – पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणी जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे हे सरकारी साक्षीदार म्हणून मुंबई सत्र न्यायालयातील सीबीआय कोर्टात आज  हजर झाले होते. पद्मसिंह पाटील यांनी मला जिवे मारण्याची धमकी देत माझी सुपारी दिली होती. याची मी पंतप्रधानांपासून मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून तक्रार केली होती, मात्र त्याची कुणीच दखल घेतली नाही. कारण पद्मसिंह पाटील हे तात्कालीन मुख्यमंत्री शरद पवारांचे नातेवाईक आहेत. असा आरोप अण्णांनी आपल्या जबानीत केल्याने एकच खळबळ उडाली आहे.

तेरणा साखर कारखाना भ्रष्टाचार प्रकरणी आपण पद्मसिंह पाटील यांच्याविरोधात अनेक पुरावे सादर केले होते तरीही कोणतीही कारवाई झाली नाही. याचा निषेध म्हणून मी पद्मश्री, वृक्षमित्र हे पुरस्कार परत केले मात्र त्याचाही उपयोग झाला नाही. म्हणून मी शेवटचा उपाय म्हणून आपण उपोषणाला बसलो. त्यानंतर सरकारनं पी.बी. सावंत आयोगाकडे या भ्रष्टाचाराची चौकशी सोपवली.या चौकशीत पद्मसिंह पाटील दोषी ठरल्यामुळे त्यांना राजीनामा द्यावा लागला. मात्र याचा राग मनात धरून, पद्मसिंह पाटलांनी मला जिवे मारण्याची धमकी देत माझी सुपारी दिली होती असा आरोप आण्णांनी केला आहे.