“नातं विश्वासाचे” (नूतन कॉलेज ऑफ इंजिनीरिंग आणि रिसर्च) च्या युवकांची तुकाराम महाराजांच्या आणि ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यात “प्लास्टिक मुक्त वारी”

0
311

पुणे, दि.२४ (पीसीबी) : “नातं विश्वासाचे” (नूतन कॉलेज ऑफ इंजिनीरिंग आणि रिसर्च )च्या युवकांच्या समूहाने तुकाराम महाराजांच्या आणि ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यात “प्लास्टिक मुक्त वारी” असे घोष वाक्य घेऊन सहभागी झाले. खरं तर सर्वांची ही पहिलीच वारी पण ३२ किलोमीटर चा प्रवास करत हे श्रमदान केले.

नातं विश्वासाचे ९ युवक कु.शिवराज नलावडे (संस्थापक), आदेश खेडेकर, पवन पाटील, गौरी अल्हाट, प्रतिक मराठे, शरद चांदेल, वैभव शित्रें, प्रीती शेवाळे आणि संकेत दळवी यांचा समावेश होता.
दोन्ही पालखी चे दर्शन घेऊन पुणे स्टेशन पासून सासवड पर्यंत पाय वारी करत वाटेत दिसणाऱ्या प्लॅस्टिकच्या बाटल्या गोळा करून मोठ्या पॉलिथीन च्या पिशव्यांमध्ये जमा करून ठेवत गेले.
तब्बल ४८ मोठ्या पिशव्या भरून प्लास्टिक या युवकांनी जमा केल्या.

स्वच्छता मोहीमसोबतच त्यांनी ठिकठिकाणी केळी, खिचडी , लाडू आणि पाणीच्या बाटल्यांचे ही वाटप केले. तुकाराम महाराजांच्या पालखी समोर फुगडी आणि नृत्य करत पोलीस, सैनिक आणि वारकऱ्यां सोबत वारीचा आनंद देखील घेतला.

“माऊलींच्या वारीत मध्ये टाळ, मृदुंग, विठ्ठल नावाचा जयघोष आणि वारकऱ्यांशी संवाद साधत वाट कधी संपली कळलीच नाही , वारी चे सुख आम्हाला दर वर्षी लाभावे”, असे गौरी आल्हाटने अनुभव व्यक्त करताना सांगितले.