धरण खेकड्यांनी फोडल्याचा दावा करणाऱ्या सावंतांच्या घराबाहेर सोडले खेकडे

0
511

पुणे, दि, ९ (पीसीबी) – जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांच्या घराबाहेर आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी खेकडे फेकले. रत्नागिरीतील तिवरे धरणफुटी खेकड्यांमुळे झाल्याचं वक्तव्य सावंत यांनी केलं होतं. त्याचा निषेध करत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी सावंत यांच्या घराबाहेर खेकडे फेकले. 

सावंत यांच्या घराबाहेबर खेकडे फेकतानाचा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा व्हिडिओ समोर आलाय. राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते अचानक आले आणि खेकडे फेकून निघून गेले. ठाण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनीही गेल्या आठवड्यात पोलीस ठाण्यात खेकडे नेले होते. खेकड्यांना अटक करा, अशी मागणी त्यांनी केली होती. रत्नागिरीतील तिवरे धरणफुटीत १९ जणांचा मृत्यू झाला आहे.