‘त्या’ १४ आमदारांना पुणे परिसरात हलवले

0
345

पुणे, दि, ९ (पीसीबी) – आमदारकीचा राजीनामा देऊन मुंबई गाठणाऱ्या काँग्रेसच्या १०, जेडीएसच्या ३ आणि एका अपक्ष आमदाराला पुण्याहून ९० किमी अंतरावर असलेल्या एका ठिकाणी हलवण्यात आले आहे. या चौदा आमदारांचा राजीनामा विधानसभा अध्यक्षांनी स्वीकारल्यास हे आमदार परत बेंगळुरू गाठू शकतात. या १४ही आमदारांना अपात्र ठरवत ६ वर्षं निवडणूक लढू देऊ नये अशी मागणी काँग्रेसने विधानसभा अध्यक्षांकडे केली आहे. 

शनिवारी कर्नाटक विधानसभेतील १३ आमदारांनी आपले राजीनामे विधानसभा अध्यक्षांकडे सुपूर्द केले होते. त्यानंतर सोमवारी नागेश या अपक्ष आमदारानेही राजीनामा देत मुंबई गाठली. या १४ आमदारांना मुंबईहून गोव्यातील एका रिसॉर्टवर हलवण्यात येणार होते. पण गोव्याला हलवण्याऐवजी पुणे-सातारा रस्त्यावरील एका ठिकाणी त्यांना हलवण्यात आलं आहे.

विधानसभा अध्यक्षांनी त्यांचा राजीनामा मंजूर केल्यास हे १४ही आमदार बेंगळुरूसाठी रवाना होतील. काँग्रेसने मात्र या १४ही आमदारांना निवडणूकीसाठी अपात्र ठरवत सहा वर्षं निवडणूक लढवू देण्यात येऊ नये अशी मागणी केली आहे.दरम्यान काँग्रेसचे अधिक तीन आमदार आज राजीनामा देणार असल्याची सध्या चर्चा आहे.