धनगर समाजाला आरक्षण न मिळाल्यास भाजप सरकारचे पानिपत करु; प्रकाश शेंडगेंचा इशारा

0
909

सांगली, दि. २५ (पीसीबी) –  धनगर समाजाला आरक्षण देण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. मात्र आता ते  शिफारशीची भाषा करून धनगर समाजाला फसवण्याचा उद्योग करत आहेत,  अशी सडकून टीका धनगर समाजाचे नेते व राष्ट्रवादीचे माजी आमदार प्रकाश शेंडगे यांनी केली आहे. धनगर समाजाला  आरक्षण न मिळाल्यास या सरकारचे आगामी निवडणुकीत पानिपत करु, असा इशारा शेंडगे यांनी  राज्य सरकारला दिला.

सांगलीच्या नागज येथे आयोजित शेतकरी मेळाव्यात बोलताना मुख्यमंत्र्यांनी धनगर समाजाला आरक्षण देण्याबाबत केंद्रीय आयोगाकडे शिफारस करण्याचे आश्वासन  दिले होते. मुख्यमंत्र्यांच्या या  विधानावर प्रकाश शेंडगे यांनी  जोरदार टीकास्त्र सोडले.

आमचे सरकार आल्यास धनगर समाजाला आरक्षण देऊ,  असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले होते. केवळ तोंडी आश्वासन नाही तर लेखी स्वरुपातील आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले होते. मात्र तेच मुख्यमंत्री आता धनगर समाजाच्या आरक्षणाबाबत केंद्रीय आयोगाकडे शिफारस करण्यात येईल, असे आश्वासन देत आहेत, असे प्रकाश शेंडगे म्हणाले.