वानवडीत कोयत्याने वार करुन सराईत गुन्हेगाराचा खून

0
2398

वानवडी, दि. २५ (पीसीबी) – एका सराईत गुन्हेगाराचा चार जणांनी मिळून कोयत्याने वार करून खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना सोमवारी (दि.२४) रात्री साडेअकराच्या सुमारास वानवडी येथील शांतीनगरमध्ये घडली.

खन्ना रामू परदेशी (वय २८ रा. वानवडी बाझार) असे खून झालेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. याप्रकरणी सॅबॅस्टीम सॅम्यूल जॅान (वय ३१, रा. वानवडी बझार) यांनी वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, बबलू उर्फ हैदर परदेशी (वय २४, रा. वानवाडी),  अक्षय विनोद कांबळे (वय २२, रा. वानवडी बाझार) आणि अन्य दोन अज्ञात फरारी आरोपीं विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वानवडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एक महिन्यापूर्वी आरोपी कांबळे याला खन्ना याने मारहाण केली होती. याबाबत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. सोमवारी रात्री शांतीनगर येथे मोकळ्या मैदानात खन्ना आपल्या मित्रासोबत दारू पिवून तेथेच झोपी गेला होता. त्या अवस्थेत बबलू, अक्षय आणि त्यांच्या दोघा साथीदारांनी खन्ना याच्या डोक्यावर, गळ्यावर आणि हातावर कोयत्याने वार केले. या घटनेत गंभीर जखमी झाल्याने खन्ना याचा मृत्यू झाला. खून केल्यानंतर चारही आरोपी फरारी झाले आहेत. वानवडी पोलिस आरोपींचा शोध पोलिस घेत आहेत.