कोणीही एकाच पक्षाचा शिक्का लावून कायमस्वरूपी राहत नाही; खडसेंचा भाजपला सुचक इशारा

0
1274

जळगाव, दि. २५ (पीसीबी) –  कोणीही एकाच पक्षाचा शिक्का लावून कायमस्वरूपी तिथे राहत नाही, असे विधान करून माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी पुन्हा एकदा भाजपमधील आपली घुसमट व्यक्त केली आहे. खडसे यांनी याआधीही  भाजपवर ताशेरे ओढले आहेत.  आज पुन्हा एकदा त्यांनी  नाराजी व्यक्त करताना अन्याय झाला तेव्हा वेळीच प्रतिकार देखील करायला हवा, तरच समोरच्याला आपल्या शक्तीची जाणीव होते, असे म्हटले आहे.

जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यात दीपनगर येथे लेवा समाजाच्या गुणवंतांचा गौरव सोहळ्याचे आयोजन केले होते. यावेळी खडसे बोलत होते.

दरम्यान, खडसे यांच्या नाराजीकडे पक्षाने कानाडोळा केला आहे.  आपल्यासमोर काँग्रेसचा पर्याय उपलब्ध असल्याचेही त्यांनी संकेत दिले आहेत. तर काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी खडसे यांना पक्षात प्रवेश करण्याचे आवाहन केले होते. आता पुन्हा एकदा काँग्रेसने त्यांना आवाहन केले आहे. त्यामुळे खडसे कोणती भूमिका घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.