देशातील प्रत्येक नागरिक चौकीदार; मोदींचे राहुल गांधींना प्रत्युत्तर

0
516

नवी दिल्ली , दि. १६ (पीसीबी) –  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा स्वत:ला चौकीदार म्हणून  देशातील प्रत्येक नागरिक चौकीदार असल्याचे म्हटले आहे. चौकीदार देशाची सेवा करत आहेत. देशाच्या प्रगतीसाठी जे कुणी मेहनत करतात ते सगळे चौकीदार आहेत, असे मोदींनी म्हटले आहे.

मोदी यांनी ‘मै भी चौकीदार हूँ’ ही लाईन वापरत आपल्या ट्विटर हॅन्डलवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. भ्रष्टाचार, काळा पैसा, विकास, अस्वच्छता, सामाजिक प्रश्न या विरोधात लढणारा प्रत्येक नागरिक चौकीदार आहे, असे मोदी यांनी या व्हिडीओत  म्हटले आहे. मी एकटा चौकीदार नाही, तर देशाच्या प्रगतीसाठी जे कुणी कठीण परिश्रम करतात ते सगळे चौकीदार आहेत.

मोदींनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले की, आज देशाचा प्रत्येक नागरिक ‘मी पण चौकीदार’ असल्याचे बोलत आहे. यासाठी मोदींनी #MainBhiChowkidar या हॅशटॅगचा वापर केला आहे. आपल्या ट्वीटसोबत शेअर केलेल्या व्हिडीओत देशातील विविध राज्यातील लोकांना दाखवण्यात आले आहे. सरकारच्या विविध योजनांची माहिती या व्हिडीओत  दिली आहे.