स्वाभिमानीला सांगलीची जागा सोडल्याने कार्यकर्त्यांनी काँग्रेस कमिटीला ठोकले टाळे

0
614

सांगली, दि. १६ (पीसीबी) – लोकसभेची जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेला  दिल्यानंतर सांगलीतील काँग्रेस कार्यकर्त्यांनी  संतप्त भावना व्यक्त केल्या आहेत.  काँग्रेस कार्यकर्त्यांनी आज (शनिवार)  काँग्रेस कमिटी कार्यालयाला टाळे ठोकून पक्षाच्या या निर्णयाचा निषेध  केला.

सांगलीची जागा खासदार  राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी पक्षाला सोडली जात असल्याचे  बातमी आल्यानंतर काँग्रेस कार्यकर्ते संतप्त झाले. प्रसिध्द  वक्ते इंद्रजित देशमुख यांना  उमेदवारी देण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

त्यानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट उसळली. कोणत्याही परिस्थितीत ही जागा कोणालाही देऊ नये. अन्यथा गंभीर परिणाम होतील, असा इशारा कार्यकर्त्यांनी दिला आहे. अखेर काँग्रेस कमिटीला टाळे घालून कार्यकर्त्यांनी पक्षाच्या निर्णयाचा निषेध केला आहे.