खोटी दाढी-मिशी लावून आम्हाला शिवाजी, संभाजी महाराजांचे काम सांगू नका – आमदार शरद सोनवणे  

0
672

भोसरी, दि. १६ (पीसीबी) – खोटी दाढी-मिशी लावून आम्हाला शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांचे काम सांगायचे काम करू नये, अशा शब्दांत मनसेतून शिवसेनेत प्रवेश केलेले आमदार शरद सोनवणे यांनी शिरूर लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार अभिनेते अमोल कोल्हे यांच्यावर निशाणा साधला. 

शिवजन्मभूमी शिवनेरी गड ते शंभूराजांच्या स्मृतिस्थळ  वढू तुळापूर अशी शिवसेनेच्यावतीने  रॅली काढण्यात आली होती. यावेळी ते  बोलत होते. यावेळी शिवसेनेचे शिरूरचे खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील उपस्थित होते.

आढळराव म्हणाले  की, मी निधड्या छातीचा मराठा, मी शिवरायांचा पाईक, असे म्हणत मराठा कार्ड बाहेर काढले आहे.  दरम्यान, अमोल कोल्हे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. त्यांना शिरूर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.