दुचाकीला धक्का लागल्याने दोघांना बेदम मारहाण

0
367

भोसरी,दि.२२(पीसीबी) – दुचाकीला चुकून धक्का लागल्याने दोघांना लोखंडी रॉडने बेदम मारहाण केली. ही घटना रविवारी (दि. 20) सायंकाळी पावणे सात वाजता इंद्रायणीनगर, एमआयडीसी भोसरी येथे घडली.

सोपान अशोक कोरपे (वय 29, रा. बालाजीनगर, भोसरी) यांनी याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी विवेकानंद सन्मुखआप्पा स्वामी (रा. धावडेवस्ती, भोसरी) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी कोरपे त्याच्या मोपेड दुचाकीवरून जात होते. इंद्रायणीनगर येथील केजीएन गॅरेज समोर कोरपे यांचा एका दुचाकीला चुकून धक्का लागला. त्यामुळे धक्का लागलेली दुचाकी खाली पडली. यावरून आरोपी स्वामी याने फिर्यादी आणि त्यांच्या भावाला शिवीगाळ करत हाताने मारहाण केली. त्यानंतर लोखंडी रॉडने फिर्यादी यांच्या हातावर, पायावर मारून गंभीर जखमी केले. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.