सकाळच्या वेळी घरफोडी करून मोबईल पळवला

0
173

पिंपरी,दि.२२(पीसीबी) – सकाळच्या वेळी अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून घरातून एक मोबईल फोन चोरून नेला. ही घटना शनिवारी (दि.19) सकाळी साडेसहा ते आठ वाजताच्या सुमारास रिव्हररॉड, पिंपरी येथे घडली.

प्रेम जयराम तीरथानी (वय 33, रा. रिव्हररोड, पिंपरी) यांनी याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शनिवारी सकाळी त्यांच्या घरात झोपलेले असताना त्यांच्या घराचा दरवाजा बाहेरून कडी लाऊन बंद होता. सकाळी साडेसहा ते आठ वाजण्याच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी दरवाजाची कडी उघडून घरात प्रवेश केला. घरातून 12 हजार रुपयांचा एक मोबईल फोन चोरट्यांनी चोरून नेला. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.