दुचाकीने दिलेल्या जोरदार धडकेत दोघा पादचाऱ्यांचा मृत्यू; भोसरी आणि चाकण येथील घटना

0
896

भोसरी, दि. ३० (पीसीबी) – दुचाकीने दिलेल्या जोरदार धडकेत भोसरी एमआयडीसी येथे एका पादचाऱ्याचा तर चाकण येथे रस्ता ओलांडणाऱ्या एका ५० वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे.

जमानसिंग गौरी बिस्ट (वय ५०, रा. चाकण) आणि शब्बीर याकुब शेख (रा. फुल्लेनगर झोपडपट्टी, भोसरी एमआयडीसी) असे मृत दोघांची नावे आहेत. याप्रकरणी चाकण आणि भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानुसार दुचाकीचालक भिमाराम देवासी (वय ३७, रा. म्हाळुंगे) आणि उध्दव रतन घोरपडे (रा.वैदवस्ती, पिंपळे गुरव) या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी (दि.२७) चाकण येथे गौरी बिस्ट या रस्ता ओलांडत होत्या. यावेळी आरोपी दुचाकीस्वार भिमाराम यांनी त्याच्या ताब्यातील दुचाकी हाईगाईने वेगात चालवून गौरी यांना जोरदार धडक दिली. यामध्ये गंभीर जखमी होऊन त्याचा मृत्यू झाला. तर भोसरी एमआयडीसी येथील घटनेत शब्बीर शेख हे पायी जात असता आरोपी दुचाकीस्वार घोरपडे याने त्याच्या ताब्यातील दुचाकी हायगाईने वेगात चालवून शब्बीर यांना जोरदार धडक दिली. यामध्ये त्यांचा देखील मृत्यू झाला. या दोन्ही प्रकरणातील आरोपी दुचाकी चालकांना अद्याप अटक करण्यात आलेली नाही. चाकण आणि भोसरी एमआयडीसी पोलीस अधिक तपास करत आहेत.